” खा मटण घ्या लोटांगण ?”
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
(भट बोकड मोठा)
पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२
“ओढू नका दारूची बाटली,
भटांपुढे साहेबांची फाटली ?
नका खाऊ बोकड मटण,
आता तरी दाबा योग्य बटण !
साहेबांनी खाल्ले म्हणे मटण,
म्हणून बाहेरून घेतल लोटांगण !
जो भटांना भितीने थर्रर्र कापतो,
तोच तुम्हाला दररोज कापतो !”
नास्तिक असण म्हणजे बुध्दीवादी असण अस भाई माधवराव बागल हे त्यांच्या ‘नास्तिक व्हा !’ या पुस्तकात म्हणाले. पण आज कोणी मुर्त्यापुढे लोटांगण घेतोय तर कोण भटांपुढे ?बुद्धीवादी म्हणजेच नास्तिक असण कस म्हटल तरी चालेल कारण माणसाची मेंदू बुद्धी ठिकाणावर असला की, माणुस विचार करू लागतो पण आजचे राजकारणी केवळ मताचा आकडा कसा वाढेल व सत्ताधीस होऊन सत्तेची मलई कशी चाखता येईल याचाच जास्त विचार करतात. म्हणून यांना राजकारणातले चाणाक्य, तेल लावलेले पैलवान, जाणता राजा ह्या उपाध्या देऊन त्यांचे भक्त डोक्यावर घेतात मात्र हे खरच बुध्दीवादी नास्तिक आहेत का ?सरळच सांगायच झाल तर हे जाणते राजे नसून केवळ नेणते राजे ?व सत्तेची मलईखाऊ ‘बुंदी’वादी चाणाक्य ?आहेत. कारण भाई माधवराव बागल म्हणतात की, नास्तिकवादी असेल तोच मानवतावादी असतो. देव, ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक, कर्मविपाक यावर विश्वास ठेवणारा समतावादी असूच शकत नाही. ईश्वरावर श्रध्दा व व्यक्तिस्वातंत्र्य एका ठिकाणी राहुच शकत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक असून ते मंदिरांमध्ये जात नाही अशी टीका काही आठवड्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. यावरुन बराच वाद झाला होता. असं असतानाच आज शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरामध्ये पोहोचले. मा. शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भिडे वाडयाची बाहेरून पाहणी केली. त्यानंतर ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या विश्वस्तांकडून शरद पवारांचा सत्कार करण्यात आला..मात्र शरद पवार मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेऊन पुढे रवाना झाले. (लोकसत्ता २७ मे २२) इतरांनी कोणी नास्तिक आहे अस म्हणताच त्याला घाबरून किंवा मताच विभाजन होईल. या भितीपोटी जर देवदर्शन करतानाचे फोटो सोशल मिडीयावर दाखवून आपण आस्तिक असल्याच दाखवाव आणि दाखवल जात असेल तर अवघड आहे. आस्तिक राज ठाकरेंनी मा. शरद पवार यांचेवर नास्तिकचा ठपका ठेवला तो योग्य नव्हता का ?पण नास्तिक म्हणजेच काय हे भक्तांना काय घंटा समजणार आहे ?ते पण लगेच बघा बघा हे फोटो, आमचे साहेब आस्तिक आहेत म्हणून दंवडी देत सुटले. म्हणून अशा भक्तांना थेट भाई माधवराव बागल यांच्याच भाषेत सांगावं वाटत की, आपल्याला मनुष्य म्हणून जगायचे आहे, असे खरोखरी वाटत असेल तर ईश्वरविषयक भ्रामक ध्येयाच्या कल्पना आपण सोडल्या पाहीजेत. या बहुसंख्य अज्ञानी अंधश्रद्धाळू समाजाला जागृत केल पाहीजे… मूर्तिपूजा, ईश्वर, स्वर्ग, नरक, दैववाद कर्मविपाक हे सर्व खोटे आहे. बुद्धिवान स्वार्थी वर्गाने, व्यक्तींनी व धर्मगुरूंनी खालच्या श्रमजीवी समाजाला पकडून त्याच्यावर आपलं सामाजिक, धार्मिक, वर्गिक वर्चस्व टिकवण्याकरता तयार केलेली ही जाळी आहेत.
मा. शरद पवार यांनी मंदिरामध्ये जाण्याचं का टाळलं यासंदर्भात पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की,“शरद पवारांनी मांसाहारी जेवण केल्याने ते मंदिरामध्ये गेले नाहीत. चुकीचा पायंडा पडता कामा नये, असे त्यांनी मला सांगितलं.”(लोकसत्ता २८ मे २२) मंदीरामध्ये कोण काय खाऊन आल हे ज्या सृष्टीचा निर्माता ?ला कळत नसेल तर त्याच्या दर्शनासाठी काय म्हणून जावे ?पुरोगामी महाराष्ट्रात प्रतीगामी विचारधारेच काम जोरदार तर हेच राजकारणी मंदीरांपुढे हात जोडून जास्त करतात. प्रश्न मा. शरद पवार मंदीराकडे का गेले याचा मुळीच नाही. त्यांनी कुठे जाव कुठे जाऊ नये हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. पण ते ज्या महापुरूषांच नाव घेऊन राजकारण करतात त्या महात्मा फुलेंनी गणपतीला ढंबूढे-या म्हणत त्याच्या सोंडेची पार ऐसी तैसी केली. मी गौरी गणपतीला देव माणणार नाही व त्यांची पुजा करणार नाही असं डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले मग त्यांचेच नाव घेऊन जर हे जाणते राजे ?मंदीराच्या पाय-यावर लोटांगण घेत असतील तर यांना ‘बुंदी’जीवी म्हटले तर काय चुकीच आहे ?.परंतू उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, पवार साहेबांनी नेहमी शाहु फुले आंबेडकरांचाच विचार पुढ नेण्याच काम केल. https://youtu.be/4YG8OxR6S9s त्यांना सांगावं वाटत की, महात्मा फुले व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव केवळ मतांचा आकडा वाढविण्यासाठीच घ्यायचे का ?ज्या महात्मा फुले व डाँ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांनी मोरया नाकारला त्यांचेच नाव घेऊन जर मा. शरद पवार त्या मोरयापुढे साष्टांग दंडवत घेत असतील तर हे या गुरु शिष्यापेक्षा बुध्दीवादी झाले का ?याचाही भक्तांनी विचार करावा. म्हणून तर भाई माधवराव बागल म्हणतात की, डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मानतो. तेच आमचे पुढारी आहेत. त्यांची जयंती करतो, आम्ही त्यांचे पुतळे उभारले आहेत. त्यांच्या नावे संस्था काढल्या आहेत….त्यांनी जीव एकवटून मरणकाली तुमच्या कल्याणासाठी जो उपदेश केला, तो तेवढा पाळत नाहीत. हे बाबासाहेबांचे भक्त नव्हेत. ते आपल्या समाजाचेही हित पाहणारे नव्हेत. समाजसेवेचे ढोंग करणारे स्वार्थी भोंदू होत. यातले काही आंबेडकरांची स्तुती गातात व त्याच तोंडाने….गीतेची व राम कृष्णाची स्तुती गातात. बाबासाहेबांनी सर्व डिग-या मिळवून ….अन् हे शहाणे शिकून आंबेडकरांच्या जीवणाचा अभ्यास करून त्यांचा उपदेश पायाखाली तुडवितात व मूर्तीची पूजा करतात. शाहू फुल्यांच्या भक्तांचीही हीच त-हा. जयंती मयंती करायला पुढे. अन् त्यांच्या आचार विचारांचे अनुकरण करायला मागे.
मुर्तीपजा करण्यापेक्षा गोविंद बागेच्या भक्तांनी बुध्द शिव फुले शाहु आंबेडकर आण्णाभाऊ यांच्या विचारांचे वाचन करून बुद्धीवादी व्हाव म्हणजेच नास्तिक व्हाव. ‘बुंदी’वादी होण्यापेक्षा महापुरुषांचे विचार समजून घेऊन ते आचरणात आणून बुध्दीवादी होणे लाखपटीने भारी आहे. प्रतीगामी विचारधारा लोकांना बुध्दीवादी म्हणजे नास्तिक होण्यापासून जसी रोखत आहे, तसेच पवार साहेब हे देखिल स्वतः मंदीरांच्या पाय-या झिजवुन रोखत आहेत अस म्हटल तरी चुकीच ठरणार नाही. भक्त म्हणतात की, पवार साहेबांचा नियोजित दौरा हा भिडे वाड्याची पहाणी करण्यासाठी होता पण दगडूशेठ गणपती व भिडेवाडा एकमेकांसमोर असल्यामुळे पवार साहेबांनी त्याकडे सहज नजर मारुन पुरोहीतांनाही खुष केल अस भक्ताड अँण्ड कंपनी म्हणत सारवासारव करताना दिसते. त्या भक्ताडांना विचारावं वाटत की, राजकीय नेता घरातून बाहेर पडण्यापुर्वीच दौ-याच नियोजन केलेल असत. पोलिस प्रशासनाला याची सर्व माहीती दिलेली असते. मा. शरद पवार हे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार असा दौरा सुनिश्चित व सुनियोजित होता कारण की, सामने सकाळी १२ वाजून १९ मिनीटालाच शरद पवार हे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. बातमीप्रमाणे सर्वकाही घडले पण साहेब मंदीरामध्ये गेले नाहीत ही वेगळी गोष्ट आहे कारण त्यांनी मटणांचा रस्सा चाखला होता म्हणे. साहेबांनी मंदीरात जाऊन डोक टेकल असत पण समाजातील बुद्धीवादी लोकांकडून तिव्र प्रतिक्रीया आल्या असत्या या भितीपोटी त्यांनी मटणाच पिल्लू तर सोडल नसेल ?. कारण साहेब बोलतात एक आणि करतात एक हे शेतकरी विरोधी कायदे, इव्हीएम मशीन विरोधी अंदोलन व जेम्स लेन प्रकरण हे भक्त वगळता सर्व बुध्दीवादी वर्गाच्या सहज लक्षात येत. पण मुर्तीपुजक राजकारणी असोत की भांडवलदार ते समाजाचे किंवा समाजहीताचे काम करत नाहीत म्हणून तर ‘नास्तिक व्हा !’ या पुस्तकात भाई माधवराव बागल म्हणतात की, मूर्तिपूजा ही महाभयंकर गोष्ट आहे या वारूळातून अनेक विषारी सर्पांची निपज झाली आहे. अज्ञानी निरक्षर, कष्टकरी समाजाला ती आपल्या विळख्यात आवळून घेत आहे. देव, ईश्वर, स्वर्ग, नरक या साधनांनी, अंधश्रध्देची मोहिनी समाजावर टाकून आपल्या जाळ्यात पकडून ठेवल जातं. त्याची विवेकबुध्दी नष्ट करण्यात येते. ती नष्ट झाली की धर्मगुरू, राजे, क्षत्रिय, जमीनदार, सावकार, भांडवलदार त्याला गुलाम करतात व त्या गुलामीवर कष्टक-यांना राबवून सत्ता व ऐश्वर्य भोगतात.
एकीकडे लोकांना दोन वेळच्या जेवणाचे वांदे निर्माण झालेत तर दुसरीकडे ऐतखाऊ लुटांरूच्या टोळीकडे पैशाचे ढिग साठलेत. काहींना जेवणाची चिंता तर काहींना जवळ असलेल्या पैशाची चिंता सतावते, त्या पैशाची विल्हेवाट कशी लावायची हा त्यांच्यापुढे गहण प्रश्न आहे. म्हणून ते मंदीरांच्या पुढे लोटांगण घेऊन दानपेठ्या भरताना दिसतात. हे पाहुन मग पोटाला चिमटा देऊन सामान्य माणस ह्या बांडगुळांच अनुकरण करत मंदीरांच्या घंटा बदडून दानपेठ्या फुगवण्यासाठी थोडासा हातभार लावून सर्व सुख मिळेल या आशेपोटी निवांत बसतो ही खुप मोठी शोकांतिका आहे. एकीकडे भट व पुरोहीत वारंवार कुरघोड्या करून महापुरुषांचा अवमान करत समाजाची बदनामी करतात. एकीकडे राजर्षी शाहु महाराज, भाई माधवराव बागल या मराठा समाजातील जाणकारांनी वेळोवेळी ब्राम्हणी व्यवस्थेला आळा घालाण्यासाठी प्रयत्न केले तर आता ते काम लेखक डाँ. बालाजी जाधव यांनी ‘ब्राम्हणांना का झोडपू नये ?’ असे पुस्तकाच लिहुन ब्राम्हणांना थेट इशारा दिला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजातील शरद पवार हे भटांकडून महापुरुषांचा अवमान केला गेल्यास शांत दिसतात. पण त्यांचेच मिटकरी व भुजबळ यांचेकडून भटांचा अवमान झाल्यास मा. शरद पवार भटांना परिषदेच निमत्रंण देऊन भटांच्या पायी ?माथा टेकताना दिसतात. सांगायचं एवढच की, आपण नेमका कोणत्या मराठ्यांचा आदर्श घेणार आहोत ?.त्यामुळे अशा लुटारू दगडांसाठी ‘असे हे धर्म’ या पुस्तकात भाई माधवराव बागल म्हणतात की, ‘त्या दगडाने चालत्या बोलत्या माणसाला दगड बनवावं’ याची डोक लाज ठिकाणावर असलेल्या शहाण्यांना तरी नको काय ?.
बहुजन समाजातील तरुणांना सांगावं वाटत की, मुर्तीपूजा व व्यक्तीपुजा करून आयुष्याची राखरांगोळी करून घेऊ नका. तुम्ही ज्यांना आदर्श म्हणून व्यक्तीपुजा करता ते मंदीरात घुसले की, तुम्ही सुसाट मंदीराकडे धाव घेऊ नका. नेत्याने मंदीराकडे घेतलेली धाव ही त्यांच्या मताचा आकडा वाढेल या आशेपोटी असते तर तुम्ही घेतलेली धाव ही तुमच्या बुध्दीचा विनाश करणारी असते, त्यामुळे वेळीच सावध व्हा. भक्तांनो व्यक्तीची थोडीसी भक्ती कमी करून आपला नेते ज्या महापुरुषांचे नाव घेऊन मताचा जोगवा म्हणतो तो त्या महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण, आचरण करतो का ?याचा विचार करा. म्हणून तर अशा भक्तांसाठी भाई माधवराव बागल म्हणतात की, ज्या कार्यकर्त्यांना आपल्या विचारांशी प्रामाणिक रहायचं असेल, खोट्यालोकप्रियतेला बळी पडून लोकांना सन्मार्ग दाखवायचा नसेल व केवळ सद्सदविवेक बुद्धीशी इमान राखायचं असेल त्यांनी व्यक्ती कोण याचा विचार न करता विरोधी आवाज उठवलाच पाहीजे.
“आमचे मराठा भाई माधवराव होते खरे आंबेडकरवादी
तर मराठा शरद पवार साहेब आहेत पक्के नथुरामवादी ?
भाई माधवराव बागल होते नास्तिक खरे बुद्धीवादी
थोरले साहेब कभी आस्तिक तर कभी कभी नास्तिक ‘बुंदी’वादी ?
नको नको, बाबा नको हो, नेता कधीच नको जातीचा पातीचा,
नेता असावा हो महापुरुषांचे विचार अन् त्यांच्या मतीचा !.”
नवनाथ रेपे लिखित
“भट बोकड मोठा” पुस्तक मागविण्यासाठी
संपर्क – रुक्माई प्रकाशन, बीड
मो. ९७६२६३६६६२