वर्क ऑर्गनायझेशन मार्फत रोपटे वितरण
आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे पूर्ण झाली या अमृत महोत्सव प्रसंगी आज वर्क ऑर्गनायझेशन मार्फत कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपूरी,शाहूपूरी, आणि राजारामपूरी पोलिस ठाण्यात सर्व पोलीस बांधवांना आणि भगिनींना त्यांचा सन्मान म्हणून रोपटे देऊन गौरविण्यात आला तसेच ऑर्गनायझेशन मार्फत मिठाई वाटप ही करण्यात
आली.
या विशेष कार्यक्रमास प्रा.शाहिद शेख यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले
या कार्यक्रमात विशेषतः महिला चा सहभाग उल्लेखनीय होता.
शहनाज काझी,सीमा मोडक,शाहिन सौदागर,वाफिया काझी आणि निलोफर मोगल या महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दरम्यान कार्यक्रमाची प्रस्तावना समीर मुजावर यांनी केले.युसुफ काझी यांनी ऑर्गनायझेशनची ध्येय आणि धोरणे सांगितले तर मुनीर मुल्ला यांनी आभार मानले व सुहेल शेख,फजल मोडक,सफवान काझी आदी पदाधिकारी उपस्थित होते.