सत्ता आणि सत्तेची उद्ठ भाषा
सत्तेची भाषा उद्धट भाषा सत्याची भाषा हिंसा वाद्यांची भक्ष्य भाषा
असे विधान विसंगत वाटते ते स्वीकारताना जड जाते या विधानाचा उत्तरार्ध सत्याची भाषा उद्धट भाषा याची अनुभूती जगाला नाहीतर व्यक्तिगत जीवनाला सतत यायला हवी सत्यासाठी प्रखर भाषा बोलणारे विवेकी लोक हवे असतात उद्धटपणा आणि सत्य सत्ता आणि उद्धटपणा यांचा संबंध खूप आहे परंतु नैतिक मूल्यातील सत्य आणि वर्तन मूल्यातील उद्धटपणा हा एकत्रित जोडल्यामुळे सत्य आणि सत्ता या गंभीर बाबींबाबत भाषा अत्यंत बेदरकार वर्तन करते
अभिव्यक्ती असहमती हे समाजाचे नित्यवर्तन असल्याने असायला हवे असहमती हा विरोधी विचार असतो असहमती हे अमान्य असते हे खरेच पण सहमती ही गृहीत मान्यता व हितसंबंध व तत्व स्वीकार करीत पुढे जाते ते बहुतांश वेळा सहमतीच्या वर्तनात आढळून येते सहमती म्हणजे सर्वांची मान्यता होय सर्व म्हणजे कोण तर बहुसंख्यांक म्हणजेच सर्व लोक होय सर्व आणि बहुसंख्यांक हे पुन्हा अविवेकी आणि हितसंबंधाचे प्रभुत्व राजकारण करणारे लोक असतात त्यामुळे त्यांची सहमती ही विचाराची दडपशाही असते बहुसंख्यांकाचा विचार हा बहुसंख्यांकाच्या संख्यात्मक प्रभावामुळे लादला जातो स्वीकारण्यास भाग पाडला जातो किंबहुना तोच सत्याचा आवाज आहे अशा स्वरूपात समाज जीवनात तो प्रकट होत असतो बहुसंख्यांक हे अंतरिक उद्घाटपणाचे अमान्यतेचे वर्तन करीत असतात विचार आणि उद्धटपणा ही एकमेकांच्या विरोधात असतात जेथे विचार नसतं जिथे चुका दुरुस्ती करण्याची नम्रता नसते तेथे भाषिक उद्धटपणा व्यक्त होताना आढळून येतो भाषेतील व्यक्त होणारा नकारात्मक इतर विचार करणाऱ्या व्यक्तींचा अपमान करणारा वर्तन प्रकार जो असतो तो एक प्रकारे विचार नकार असतो विचार स्वीकारणे म्हणजे स्वयम निर्णय आणि सत्ता गमावणे असे गृहीत धरून संवादक हा इतरांचा सत्य विचारसुद्धा नाकारण्याचे गैरवर्तन करीत असतो
मुळात संवाद हा विचारासाठी असतो विचारातून सारासार सर्वांचे हिताचा सर्वांना मान्य असणारा असा सम्यक मार्ग स्वीकारणे हे विचार असे प्रधान कार्य असते विचार हा वर्तन परिवर्तनाचा प्रेरक असतो विचार हे प्रबोधन करीत असते विचार ही मानवी बुद्धीची विकसित अशी वर्तन प्रक्रिया आहे जे न्याय आहे जे सर्वांचे हिताचे आहे जे सर्वांना स्वीकारणे शक्य आहे अशा कल्याणकारी वर्तनाचा आग्रह विचारात असतो तो विचार हा प्रबोधन विचारा असतो तो व्यक्तीच्या दुःखाचा निर्मूलनाचा सदोदित श्रेष्ठ विचार करीत असतो म्हणून अशा विचाराबद्दल विचार करताना आकलन वाढते वर्तन बदलते चुका दुरुस्त होतात नवे वर्तन परिवर्तन हे लाभदायक असते यामधून साध्य होणारी हितकारकता साकारते आणि म्हणून विचार आणि असहमती विचार आणि प्रबोधन विचार आणि आचरण या पातळ्यांवर प्रत्येक व्यक्तीच्या आणि समाजातील प्रत्येक घटकाचे भाषिक आणि आचरण पातळीवर वर्तन व्हायला हवे. आजचा समाज भावना असहमती विरोध नकार हे व्यक्त करीतच बहुतांश वर्तन करतो आणि त्यातूनच सामाजिक विधवेश असंतोष विद्रोह वाढतो ही प्रक्रिया एका व्यक्तीच्या मुळे घडते असे नाही तर इथे समाज रचनेमध्येच सांस्कृतिक रचना बंध आणि तार्किक रचना बंध अशा दोन व्यवस्था सतत चालू असतात सांस्कृतिक रचना बंध ही व्यवस्था असहमतवादी असते विरोधी विचार नाकारते ती विवेक संपवते ती स्वातंत्र्य नाकारते ती स्वयंप्रभुत्वाचा दहशतवाद लादत असते ही सांस्कृतिक रचना बंध व्यवस्था हीच भाषेतून प्रकट होत असते आणि त्यामुळे सांस्कृतिक रचना बंध नियंत्रक हे खूप धूर्त कपाटनीतीने समाजातील सर्व काळात पुढे येत असलेला विचाराचा विचार प्रबोधनाचा विचार विवेकाचा विचार शांती सदभावाचा विचार हा दडपण्याचे काम ते करीत असतात आणि त्यामुळेच समाजातील विचाराचा विचार पुढे नेणारे तर्क रचना बंध पुढे जात नाही
ज्या समाजात विचाराचा इतिहास निर्माण झाला नाही त्या समाजात विचाराचे प्रबोधन ही धूसर व अवघड वाट ठरते सांस्कृतिक रचना वादी हे नेहमी असत्यच उद्धटपणे कथन करीत असतात असत्य हे गळी उतरवण्यासाठी उद्धटपणा आक्रमकता याचा आधार घेतला जातो त्यासाठी वापरण्यात येणारी आक्रस्थाळी आक्रमक भाषा ही क्रोधाचे रूप असते ते भाषिक राजकारण असते असत्य हे क्रोधाने व्यक्त केले की समोरील श्रोता व्यक्ती समाज हा भयग्रस्त होतो तो स्वतःच आपले वर्तन चुकल्याच्या न्यूनगंडाने ग्रस्त होतो आणि स्वतःच्या न्याय रास्त भूमिका तो सोडून असत्य दहशतवादी उद्धट भाषिकाच्या प्रभावाखाली जातो हे भाषेचे प्रभाव राजकारण हा उद्धटपणाचा अविष्कार आणि परिणाम असतो सर्वसाधारण भाषकांच्या वर्तनात आवेग असतो आक्रमकता असते पण टोकाचा असंतोष अभद्र भाषा ही समाजाला नेहमी नवी वाटते ही नेहमी आश्चर्यकारक वाटते
त्यामुळे विद्रोह असंतोष शिवराळपणा निंदा अपमान या मानवी खूप प्रवृत्तीच्या भावना ज्या भाषेतून व्यक्त होतात ती भाषा समाजाला उत्कंठेची औस्तुक्याची भाषा म्हणून ऐकावी वाढते इथेच समाजाच्या बुद्ध्यांकाची कसोटी असते. समाजच मुळात निंदा अपमान विद्रोह असंतोष हे सगळे दुर्गुन घेऊन जगत असतो दैनंदिन जीवनात अशा घडलेल्या घटना आणि प्रसंगातून अनुभवायला येणारा असंतोष निंदा अपमान आक्रमकता ही सर्वसामान्य समाजाला मर्द मुखी वाटते ते धाडस वाटते हे समाजाचे फार मोठे अज्ञान असते. अशा भाषिक व्यक्तींना वगळायचे असते अशा भाषिक व्यक्तींना ऐकायचे नसते अशा भाषिक व्यक्तींना मान्यता द्यायची नसते अशा भाषिक व्यक्तींना निवडायचे नसते ही सुद्धा किमान समज सभोवतालच्या समाजामध्ये अद्याप वाढलेली नाही आणि त्यामुळे भाषिक हिंसा घेऊन जगणारा बहुतांश समाज भाषिक शापदांना श्रेष्ठ मानतो हे वर्तन भाषेच्या नेणिवा मार्फत होत असते
क्रोध आणि उद्धट भाषा ही एकच असते का? क्रोध हा अंतरिक नकार असतो का? क्रोध हा सुप्त सुडाचे कारण असते का? क्रोधावर नियंत्रण जेव्हा ठेवता येत नाही तेव्हा व्यक्त होणारी भाषा ही हिंसक भाषा असभ्य भाषा उद्धट भाषा म्हणून व्यक्त होते क्रोधावर संयमाने मात करता येते क्रोधातून विपरीत होणाऱ्या परिणामाच्या जाणिवेतून क्रोध नियंत्रित करता येतो क्रोध नियंत्रित करणे म्हणजे भाषिक उद्धटपणा होय
सत्याची भाषा ही निर्भय पणे जेव्हा अभिव्यक्त होते तेव्हा समाज हा समर्थक अशा भाषेचा मोठ्या प्रमाणात बनणे आवश्यक असते पण ही प्रक्रिया भय ग्रस्त अविवेकी अर्थातच तार्किक विचार रचना बंध विकसित न झालेल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात हे वर्तन आढळून येते भारतचंच नव्हेच संपूर्ण जग तार्किक रचना बंध विचार इतिहासाच्या आधारे अद्याप पुढे जात नाही त्यामुळे तर्काचा विकास होत नाही विचाराचा इतिहास तयार होत नाही विचारातून विवेकाच्या सशक्त वाटा मानवी प्रज्ञामध्ये रुजत नाहीत त्या उलट मानवी मेंदू हा भय क्रोध हिंसा याला सतत अनुकूल वर्तन करतो आणि तार्किक रचना बंध हे जीवन बंध स्वतःहून विकसित करायचे असतात ते काम व्यक्ती ते समाज या सर्व पातळ्यावर मोठ्या प्रमाणात होत नाही आणि त्यामुळेच सत्याची भाषा ही पचणी पडत नाही ती स्वीकारणे जड जाते त्यामुळे सांस्कृतिक रचना बंधाची प्रभुत्व व्यवस्था उध्वस्त होते या भीतीमुळे उद्धट भाषा प्रतिवादासाठी तर्क भाषेला विरोध करते भारताचे सर्व भाषिक वर्तन आज या दोन भाषिक रचना बंधांनी व्यापलेले आहे
भाषा ही नेहमी राजकारण करते भाषा ही सांस्कृतिक रचना बंधाचे हत्यार आहे हीच ती भाषा उद्धट पणाची भाषा म्हणून समाजाला प्रिय होते विचाराचा विरोध विचाराने हे तत्व सांस्कृतिक रचना बंध वाद्यांना स्वीकारणे जड जाते तेही स्वीकारत नाहीत आणि म्हणूनच जगभरचा मूलतत्त्ववाद हा वाढतो आहे मूलतत्त्ववाद म्हणजे हिंसा प्रेरक वर्तन करणे, उद्धट भाषेच्या आधारे विवेकाच्या विचाराला सत्याच्या विचाराला अनाथायी विरोध करणे होय सत्याची भाषा ही आपल्या श्रद्धेच्या कोणत्याही प्रतिकांच्या अर्थातच देव तत्सम असंख्य ग्रंथ कर्मकांडे पूजा पाठ यांच्या आड येत असेल तरीही प्रमाण सत्त्याची भाषा म्हणून स्वीकारण्याची निर्भयता समाजाच्या बहुसंखांक जण मनामध्ये अद्याप रुजलेली नाही ती रुजत नसल्याचे असंख्य अनुभव जगभर आता येत आहेत
सलमान रशदी यांना शुक्रवारी चाकू हल्ला करून संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल 1989 स*** त्यांचे विरुद्ध आई तुला खोमणे यांनी अथवा काढून शिरच्छेद करण्याचा इशारा दिला होता तेव्हापासून जीव मुठीत घेऊन जगणारे सलमान रसदी हे थोर जागतिक लेखक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नायक बनले होते साटनिक वर्सेस
हे त्यांचे गाजलेले वादग्रस्त पुस्तक जगातील अनेक राष्ट्रांनी या पुस्तकावर बंदी घातली बंदी उठवली पण सलमान रश्दीने आपला लेखन प्रवास थांबवला नाही आपले लेखन प्रवासाबद्दल मित्रां जवळ म्हणत असत मी स्वतः माझीच काळजी करतो आहे हा माझा लेखन धर्माचा परिणाम आहे जवळपास नऊ वर्ष अज्ञातवासात राहणाऱ्या सलमान रसदी यांना कट्टर धर्मवाद्यांनी सार्वजनिक ठिकाणी भाषणाला आल्यानंतर त्यांची शिकार जवळपास केली न्यू ऑर्क मध्ये घडलेली ही घटना ही जगभरच्या चिंतेची गोष्ट बनली आहे सलमान रसदी हे त्यांचे जीवन जगत होते तरीही 2023 मध्ये त्यांची येणारी भाषांतरित कादंबरी विक्टरी ऑफ सिटी
अर्थातच पावर अँड द हुबिरस ऑफ दोज इन पावर
या त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या उद्धट भाषेत वरील पुस्तकामुळे हे घडले असावे का? असा आता विचार सुरू झाला आहे मुळात सलमान लेखन प्रवास हा समृद्ध आहे 1981 मध्ये त्यांनी मिडनाईट चिल्ड्रन ही वास्तव कादंबरी जगाला दिली या कादंबरीमध्ये भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यातील दोन जुळ्या मुलांच्या अंधार युगातील जन्माची कहाणी विशद केली आहे सलमान रसदी हे नेहमी समाजाच्या दुहेरी वर्तनाचे वाभाडे काढत असत वैयक्तिक जीवनातले जगणे आणि समाजातील जगणे यांच्यामधील प्रचंड तफावत असलेला भारतीय समाज हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता समाज हे असे भेदाचे स्थर तयार करून कसा जगतो यामधील नाटकीयता कपटनीती व स्वार्थ यावर त्यांच्या कादंबऱ्यांमधून भाष्य केले जात सलमान रसदी हे शांत सुखवादी लेखन करते नाहीत हल्ल्यानंतरच्या त्यांच्या उपचारावर नंतर ते बरे होत आहेत ही एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने योग्य गोष्ट ठरेल
सत्याची भाषा ही परखड असते ती सांस्कृतिक रचना बंध उध्वस्त करते उद्धट भाषा मात्र असत्याला पुढे नेते उद्धट भाषा हिसेच्या आधारे सशक्त होते प्रभावी होते जनसामान्यांच्या मनावर उद्धट भाषेचा पगडा जास्त असतो भारताने जगात उद्धट भाषेने बोलणाऱ्या व्यक्ती या असत्य जरी असल्या तरीही त्यांची नकारात्मक प्रतिष्ठा ही वाढलेली असते हे ओळखूनच सर्व प्रकारची प्रसार माध्यमे भाषेचा उद्धटपणा हा मोठा करीत असतात त्याचा प्रचार जास्त करतात आणि सामान्य वाचक आणि प्रेक्षकांनी श्रोता यांच्या मनातील सुप्त असंतोष सुड हिंसा यांना खतपाणी घालत असतात हे माध्यम कर्मी मूलतत्त्ववादाचे सहयोगी असतात हे उघड करण्याचे काम तार्किक रचना वाद्यांनी चिकाटीने करायला हवे त्याशिवाय तूर्त उपाय नाही
सलमान रशदी यांच्यावरील झालेला फतवा आधारित कुणी हल्ला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे विचाराच्या असहमतीचे राजकारण इथे खपवून घेतले जाणार नाही असे संदेश देणारे हे निषेधार्य हल्ला कृत्य आहे हे जागतिक( मुस्लिम) मूलतत्त्ववाद्यांनी एकत्रित येऊन केलेले हल्ला सत्र मानवतेच्या विचार त्यासाठी दुष्कृत्य आहे याचा निषेध अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जगभरातील समर्थ करत राहतील ते करण्याची नितांत गरज आहे अन्यथा असत्य भाषेचे उद्धट संवादक हे सत्ताधारी म्हणून कायम सत्तेवर राहतील आणि सत्ताधाऱ्यांची भाषा ही उद्धट भाषा असते ही असत्य भाषा असते ही असत्य भाषाच हिंसा प्रेरक असते हे जगाच्या वर्तनाचा प्रकार होऊ द्यायचा नसेल तर यास वेळीच सत्ताधाऱ्यांची उद्धट भाषा आम्ही नाकारतो त्या सत्यभाषा असते म्हणून आम्ही नाकारतो ती निंदेची भाषा असते म्हणून नाकारतो ती हिंसेची भाषा असते म्हणून आम्ही नाकारतो असा भाषेचा नकार वाद भाषेच्या तर्कवादातून पुढे आला पाहिजे अशी एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या साठी हाक आहे प्रत्येकाच्या कृतिशीलतेची गरज आहे
शिवाजी राऊत प्रेस सातारा
75 वा स्वातंत्र्य दिन 15 आगष्ट 22 वेळ 12.52