दगडखाणीतील संतुलन पाषाण शाळेत शिकलेला स्वातंत्र्य सैनिक राहुल मगर यांच्या हस्ते ध्वजरोहनाने अमृत महोत्सव साजरा –
दगडखाण खाण क्षेत्रातील समाजासाठी रचनात्मक विकास कार्य करण्यार्या संतुलन संस्थेच्या पाषाण शाळेतील पहिला माजी विद्यार्थी राहुल सुरेश मगर यांच्या हस्ते वाघोली परिसरातील सर्व दगडखाण कामगार वस्तीवर ध्वज फडकून भव्य तिरंगा रेली काढण्यात आली.
संतुलन भवन येथे करण्यात आलेल्या ध्वजारोहनाचे ध्वज पूजन संतुलन महिला बचत गट सदस्य निर्मला धुमाळ कांचन ताई, सुरेखा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. एक्साईज विभागाचे आयुक्त क.सी.शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजरोहन कार्यक्रमास एक्साईज विभागाचे आयुक्त क.सी.शेलार. राज्य उत्पादन शुल्क सेवानिवृत्त संघटना महाराष्ट्र राज्य, सचिव प्रकाश रेणुसे पदाधिकारी शशिकांत सुपाते व राष्ट्प्रेमी युवा मंच अध्यक्ष भोलाशेठ वांजळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संतुलन संस्थेचे संस्थापक Adv.बी.एम.रेगे यांनी करतांना संस्थेचा लढा हा वान्चीताच्या हक्कासाठी रचनात्मक संघर्ष गेली २५ वर्ष चालू असून याच समाजातून आता काही स्वतान्त्यासैनिक काही वकील,उद्योजक तर काही तंत्र क्षेत्रामध्ये तर काही पारंपारिक व्यवसायामध्ये घोडदौड असल्याचे कार्यक्रमाला उपस्थितAdv. राहुल थोरात, सैनिक राहुल, मगर कुमार अवसेकर, यांची यशस्वी विधाने मांडत यशोगाथा मांडली.
संतुलन पाषाण शाळेतील विद्यार्त्यानी विविध कला गुण कार्यक्रम सादर केले. आपल्या मनोगतामध्ये प्रकाश रेणुसे यांनी संतुलन संस्थेच्या संघर्षात पाठीशी असल्याचे मत मांडले. भोलाशेठ वांजळे यांनी संतुलन संस्था सामाजिक संतुलन राखण्यासाठी अहोरात्र झगडत असल्याचे मत मांडले. संतुलन बचत गट संघटिका निर्मला धुमाळ,सुरेखा गायकवाड, राहुल मगर, राहुल थोरात व कुमार अवसेकर यांनी आपली मनोगते मांडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात एक्साईज विभागाचे आयुक्त के .सी. शेलार यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनात संतुलन संस्थेच्या संचालिका Adv. पल्लवी रेगे यांनी देशासाठी लढणाऱ्या सर्व वीर जवानांना मानवंदना देऊन उपस्थित सर्वाचे आभार मानले, कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी आदिनाथ चांदणे, अनिल राजगुरू, कृष्णा भिटे, जोसेफ सर, सीमा साळवे ,विशाल कांबळे, सारा, नीलकंठ साळे, रुपाली पुरंदरे, रोषण गिल आदींनी प्रयत्न केले यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी पालक, कामगार उपस्थित होते