जिल्हा ग्रामसेवक संघाच्या उपाध्यक्षपदी सौ. सरिता पाटील!
गुडाळ/ वार्ताहर
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ प्रणित कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी ची निवड नुकतीच होऊन संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. सरिता प्रवीण पाटील ( रा. कपिलेश्वर) यांची निवड करण्यात आली.
सौ. पाटील या नरतवडे येथे ग्रामसेविका म्हणुन कार्यरत असून त्या आवळी बुद्रुक चे मंडलाधिकारी प्रविण पाटील यांच्या पत्नी आहेत.
या निवडीसाठी माजी राज्य चिटणीस के आर किरुळकर, जिल्हाध्यक्ष एल एस इंगळे, माजी जिल्हाध्यक्ष एस डी पाटील, सागर सरावने, लालासो मोहिते आदींचे सहकार्य लाभले.
जिल्हा संघटनेच्या माध्यमातून ग्रामसेवकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी तसेच ग्रामसेवकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध राहीन अशी ग्वाही सौ. सरिता पाटील यांनी निवडी प्रसंगी दिली.