ये …बाबू जरा स्नभालके चलाना.
ये देश का डी एन ये नहीं गिरणा देना

ये …बाबू जरा स्नभालके चलाना.<br>ये देश का डी एन ये नहीं गिरणा देना

ये …बाबू जरा स्नभालके चलाना.
ये देश का डी एन ये नहीं गिरणा देना

प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनामध्ये असलेल्या अनेक अवगुनामध्ये तुच्छता द्वेष हे दुर्गुण येतात कोठून? व्यक्ती आणि समाज हा उपेक्षेचे वर्तन का करू लागतो ? नफरत आणि द्वेष यामध्ये फरक काय आहे ?उपेक्षा आणि अक्षम्य दुर्लक्ष हे एकच असते का? हे सर्व दोष वाढत गेल्याने व्यक्ती व समाजाचे कोणते नुकसान होते? व्यक्ती आणि समाज यांच्या अंगी सामंजस्य सामूहिक शांहाणपन आणि ज्ञानाची अधीरता हे गुण उ पेक्षवादामुळे रुजत नाहीत का? हे भारतीय समाजाला स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात कधी प्रतीत होणार आहे की नाही ?

मुळात समाज एक संमिश्र वर्तन प्रक्रिया आहे असंख्य प्रकारच्या हेतूने समाज गतिशील राहत असतो समाजाची साक्षरता ही केवळ अक्षर साक्षरता असल्याने मूल्य साक्षरता उपेक्षित राहिल्याने हे वर्तन घडते समाज हा भौतिक व्यवस्था साठी अधीर असतो व्यक्ती आणि समाजाच्या समान उद्दिष्टात शिक्षण उद्योग नोकरी आणि भरपूर बरकत मिळवणे समृद्धी प्राप्त करणे धनसंपदा संचय करणे हे समाजाची नित्य स्वभाव गुण आहेत समाज आपल्या कष्ट आणि प्रामाणिकपणातून हे सर्व करीत असतो समाज याला घामाचा श्रमाचा पैसा असेही म्हणतो आपले कर्तुत्व या संपत्तीच्या प्राप्तीतून सिद्ध झाल्याचा सार्थ अभिमान समाज बाळगतो कर्तुत्व ही एक मोठी व्यापक गोष्ट आहे व्यक्तिगत स्वार्थ आणि महत्त्वकांक्षा यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहणाऱ्या असंख्य माणसांचा समाज ही एक मोठी अभ्यासाची निरीक्षणाची गोष्ट असते माणसे श्रमाने कष्टाने स्वतःचे आणि कुटुंबाचे भरण पोषण करतात ही समाजाची नित्य गरज आणि स्वाभाविक वृत्ती असते यामधूनच समाज समृद्ध आणि संपन्न होत असतो समृद्धी आणि संपन्नता म्हणजे अपसंपता नव्हे पण स्व समृद्धीचा अर्थ भ्रष्टाचार करून अपसंपदा मिळवणे असा लावला जातो अप संपदा म्हणजे जेथे कुठे आहे तिथून गैरमार्गाने शासन निधीचा अपहार करणे होय असे वर्तन जेव्हा समाजाचे व्यापक वर्तन होते तेव्हा समाज हा भ्रष्टाचाराने झिंगू लागतो भ्रष्टाचार हा वाईट नाही फक्त सापडता कामा नये फक्त छळून त्रास देऊन पैसा न काढता टक्केवारीने जेवढे मिळते तेवढे घेणे होय इतकी सहजता शासनाच्या सर्व विभागांमध्ये लाच आणि घुस घेण्याबाबत समाजाच्या मनात तयार होते तेव्हा शासन नावाची गोष्ट ही कल्याणकारी असते ती विश्वस्त असते ती जनसमान्यांचा आदर करते असे कसे म्हणता येईल वस्तूचा समाज हा यथा राजा तथा प्रजा या म्हणीप्रमाणे वरिष्ठांचे वर्तन पाहून जनसामान्यांच्या वर्तनात बेभान वृत्ती निर्माण होते

समृद्धी संपत्ती अपसंपदा हे एकच मानणारा समाज सज्जन समाज असतो का?संधी आहे तोपर्यंत लुटून घ्या सामान्य माणसाला पीडत राहा नाडत राहा अशा प्रकारची मानसिकता सभोवताली असंख्य प्रकारच्या शासन विभागामधून पहावयास मिळते तेव्हा शासनाच्या सर्व विभागातील बंधू जणांचे वर्तन खूप सभ्य प्रामाणिक निष्ठावंत व सेवावृत्तीचे आहे असे म्हणता येते का?

उघड उघड असत्य सहज सहज खोटे हे जेव्हा मोठे होते असत्यच व्यवहार बनतो तेव्हा सर्व प्रकारच्या नात्यांमध्ये फसवणूक लूट हा नित्य व्यवहार बनतो का या?चा समाज कधीच विचार करत नाही त्या पदावर गेलो खूप छापले खूप कमावले खूप साठवले खूप संपत्ती केली नातेवाईकांच्या नावावर संपत्ती गुंतवली सोने आणि जमीन जुमला यामध्ये सुव्यवस्थेत पैसा गुंतवला अशा अशा प्रकारचा सर्व शासन वर्ग विचार करतो त्याच मानसिकतेचा तो असतो असा पूर्णतः दावा कोणीही करणार नाही शासनाच्या वर्गाचा असा आत्मसन्मान भंगही होता कामा नये हे खरेच पण वस्तुस्थिती समाजात काय आहे केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा 2005 हा भ्रष्टाचार निर्मूलनाचा अल्पसा प्रयत्न करणारा कायदा आहे या कायद्याचा समाजाच्या जीवनावर राष्ट्राच्या वर्तनावर शासनाच्या प्रतिनिधींच्या मानसिकतेवर कोणता परिणाम झाला याचे परिशिलन केले असता समाज बेभान झाला आहे समाज कशालाच जुमानत नाही समाज आपल्या अपप्रवृत्तीचे वाटे इतरांना वाटत राहतो भ्रष्टाचाराच्या व्यापकव्याख्याता स्वतः तयार करतो दोन टक्के ते 40% हे वाटण्यात घालवणारा शासनाचा वर्ग आणि दोन टक्के ते 40 टक्के घेणारे सर्व प्रकारचे दलाल हे समाजात सर्व ठिकाणी गल्ली ते दिल्ली येथे कार्यरत आहेत त्यांची मिली भगत आहे यातूनच भ्रष्टाचाराची बदबू बाहेर येत नाही सारे काही अलबेला असते झिरो कर्मचारी ते एजंट हे कार्यालयाच्या बाहेर काम करीत असतात कार्यालयात फक्त फायली फिरत असतात फायली थांबत असतात फायलींवर ऑफिसमध्ये नव्हे तर घरी सह्या होत राहतात कार्यालय संध्याकाळी चालत राहतात अशी शासन पुढे चालत राहते शासन हे कल्याणकारी काम करते शासन हे क्लास टू आणि क्लासवन च्या ईश्वरा समान च्या महान पुरुषांच्या कर्तुत्वाने चाललेले असते समाज यावर विश्वास ठेवतो समाजाला मोठ्या पदावरील व्यक्तींचा आजार असतो त्या व्यक्ती बुद्धिमान प्रमाणे कर्तव्य तत्पर असतील असा विश्वास वाटतो त्यामुळेच जनसामान्य हा शासनाच्या दारी हेलपाटे घालत असतो आपल्या सरळ कामाला वेळ होणार असे गृहीत धरून नागरिक मात्र स्वतःची समज करून घेत असतो आणि त्याच्याच नियमबद्ध रास्त कामाला अक्षम्य दुर्लक्ष होते उपेक्षा होते त्याचे काम तात्काळ होत नाही ज्या समाजात गैरमार्ग हाच रास्त बनतो ज्या समाजात अप्रमाणिकपणा हा मोठा होतो त्या समाजात उपेक्षा दुर्लक्ष हे सर्वसाधारण वर्तन होते शासन प्रतिनिधींना पदावरची प्रतिष्ठा ही कार्यापेक्षा जन तत्पर सेवेपेक्षा मोठी वाटते त्यामुळे उपेक्षा दुर्लक्ष आणि जनसामान्यांच्याबद्दल नफरत बाळगणारे असंख्य बाबू हे देशाचे दुश्मन असतात नागरिकांचे जीवनाला छळून नाडून लुटणारे शासन प्रतिनिधी हे देशभक्त होता आणि जनसामान्य नागरिक हा मात्र देशद्रोही ठरवला जातो नागरिकांना बदनाम करणे नागरिकांना सरकारी कामकाजात व्यत्यांना म्हणून आरोपी बनवणे हे पण छंद आता शासन प्रतिनिधी जोपासत आहेत त्यामुळे जनसामान्य आणि शासन यांच्यामधील दरी वाढत आहे जनसामान्यांच्या छोट्या-मोठ्या कामाला प्राधान्य देणे हे आपले कर्तव्य आहे असा संबंधित शासनाचा वर्ग स्वतःला मानत नाही आणि त्याचमुळे जनसामान्याच्या जीवनाला छळवादाचे व लुटीचे स्वरूप प्राप्त झाले आहे

नोकरी आणि पद जेव्हा विकत घेतली जाते तेव्हा त्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता त्याचा प्रामाणिकपणा त्याची सेवावृत्ती त्याची कामाची अधीरता काय असू शकेल? याचा विचार समाजाच्या ध्यानीमनी हे असत नाही हे सर्व गृहीत धरून सर्व पातळीवर वागणारा समाज हा आपोआप वादामुळे सर्वांच्या मान्य भ्रष्टाचारामुळे सर्वांच्या सहमतीच्या टक्केवारी कामकाजामुळे चालू आहे हे असे चालते हे असेच राहणार हे कोणीच बदलू शकत नाही मी त्याला जबाबदार नाही मी प्रामाणिक आहे मी सेवा तत्पर आहे मी लाचखात नाही लाच देत नाही लाच वाईट आहे हे मला माहित आहे असा प्रामाणिकपणाचा दावा करणारे अनेक शासन प्रतिनिधी समाजात पहावयास मिळतात त्यांच्याप्रती आदरच वाटतो पण बहुतांश वर्ग या विचाराचा कसा निर्माण होणार हा खरा प्रश्न छळत राहतो 28 सप्टेंबर 2022 हा भारतभर जगभर माहितीच्या अधिकाराचा साक्षरता दिन साजरा झाला हा शासन परिपत्रकाप्रमाणे पारदर्शक कारभारासाठी शपथ घ्यावी गतिमान कारभार व्हावा असे मनोमनी ठरवावे माहितीच्या अधिकाराचे काटेकोर पालन करावे नागरिक आणि शासन यांच्यामध्ये या कायद्याच्या अनु पालनाची साक्षरता रुजवावी आणि भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्न सर्वांनी करावे असे उद्दिष्ट असलेल्या माहितीचे अधिकार कायद्याच्या या साक्षरता दिवसाचे महत्व किती शासन प्रतिनिधींनी पाळले?

याचा शोध घेतला असता संपूर्ण जिल्ह्यात अपवादात्मक जिल्हाधिकार्यालय आणि जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी या स्वरूपाचे कार्यक्रम गांभीर्याने घेतले जातात आणि एकूण शासनाची अजगर वर्तनवादी सुस्त यंत्रणा जैसे थेच राहते शासन म्हणजे जैसे थे याचा अनुभव यातूनच येतो प्रत्येक उपक्रम याचे मामुलीकरण करणे तुच्छतेने त्याकडे पाहणे नको तो त्रास म्हणून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे हे शासनाचे सर्व सामान्य वर्तन आहे शासनाच्या प्रतिनिधींचे असे वर्तन ही आता नित्याची गोष्ट झाली आहे विकत घेतलेल्या पदांमुळे आपणाला कोणी काही करू शकत नाही त्यामुळे तत्परता गांभीर्य सेवावृत्ती बाळगण्याची गरज नाही अशी बहुतांश मानसिकता बनलेला शासनाचा वर्ग समाज व्यवस्था चे संचालन करतो समाजाच्या मानवी हक्काच्या सर्व गरजांसाठी तो कार्यरत राहतो असा तो दावा करत असतो पण वस्तुतः यापेक्षा परिस्थिती वेगळी असते

राष्ट्रभक्ती ही तात्पुरती असते दैनंदिन नोकरी हे भ्रष्टाचारी वृत्ती असते नाटक करणे हे भारतीय नागरिकांचे कौशल्य आहे अहंकार उपेक्षा आणि तुच्छता जनसामान्यांच्या बद्दल सततच्या तक्रारी हे शासनाचे आवडीचे छंद झाले आहेत जनसामान्यांच्यामुळे शासन आहे जनसामान्यांच्या करातून शासन प्रतिनिधींना पगार मिळतो लोकशाहीमध्ये सामान्य नागरिक हा श्रेष्ठ आहे त्याच्या समस्या याला सर्वोच्च प्राधान्य आहे ही साक्षरता शासनाच्या मनोमनी अद्याप भिनलेली नाही शासन म्हणजे अधिकार शासन म्हणजे पदाची प्रतिष्ठा शासन म्हणजे आदेश शासन म्हणजे निर्णय शासन म्हणजे मान आणि सन्मान या मानसिकतेने जगणारा कोणता देश महासत्ता होईल ?हे होणे नाही ज्या देशातला प्रत्येक नागरिक प्रत्येकाला फसवतो प्रत्येकाबद्दल तुच्छतेने वाटतं प्रत्येकाची निंदा करतो स्वतःच्या चाणाक्ष व कपटनीतीचा अहंकार वाढतो असा हा उपेक्षवादी सोडवावी तुच्छतावादी समाजाने शासन याचे अध्यपतन मोठ्या वेगाने होत असल्याचे दिसून येते समाज म्हणजे मी नव्हे असे कधीच मानू नये मी म्हणजेच समाजाचा एक सजग सतर्क घटक होय माझ्या वर्तनाच्या आग्रही व निष्ठेच्या भूमिका या समाजाच्या व्यापक वर्तनाचे ते परिणाम असतात म्हणून समाज हा सेवावृत्तीचा जनसामान्यांच्या आत्मसन्मानाचा तयार करण्याची जबाबदारी सर्वांची असते आणि आहे आजचा समाज जातीग्रस्त श्रीमंतीग्रस्त नेताग्रस्त प्रतिष्ठाग्रस्त आणि भ्रष्टाचार व्यस्त असा तयार झाला आहे त्यामुळे अशा समाजात सर्व प्रकारच्या न्यायिक उपक्रमांची उपेक्षा ही होत राहणार हे गृहीत धरूनच हा समाज पुढे नेण्यासाठी सार्वत्रिक प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे असे मनोमन वाटते ज्ञान प्रामाणिकपणा सेवावृत्ती तळमळ भ्रष्टाचार विहिनवर्तन याबद्दल केली जाणारी उपेक्षा ही त्या नैतिक मूल्यांच्या प्रती दाखविलेली. तुच्छता असते उन्मादी भ्रष्ट अहंकारी मुठभर समाजातील व्यक्तींना या प्रकारच्या वर्तनाने ग्रासलेल्या असते पण हेच सर्वसामान्य वर्तन जेव्हा बनते तेव्हा समाज हा एकमेकांची उपेक्षा करणे तुच्छता दाखवणे द्वेष बाळगणे आणि कपटनीतीने सतत वागणे असे जेव्हा सर्वत्र वातावरण आढळून येते तेव्हा हा देश काल नव्हता येथे स्वातंत्र्य कधीच अस्तित्वात नव्हते येथे कपटनीती तिथे छळणीती येथे उपेक्षा येथे तुच्छता येथे फसवणूक आणि येथे निर्मम इतिहास कालापासून चालत आलेला खंडणी ते भ्रष्टाचार हाच समाजाचा मुख्य वर्तन प्रकार आहे हेच त्यांच्या डीएनएचे मॅपिंग आहे ते थेट नसतात ते भेट नसतात ते ग्रेट नसतात ते फक्त डीएनग्रस्त तुच्छतावादी असतात ते नफरतवादी असतात ते जनसामान्य व गरिबांना छळणारे अहंकारवादी छोटे-मोठे सरकारी बाबू असतात

सूचना का अधिकार कानून कार्यकर्ता
हमारा पैसा हमारा हिसाब
हम जायेंगे हम जियेंगे
29 सप्टेंबर 22 वेळ7.30

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *