महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मनुवादी संभाजी भिडेलाअटक करण्याचे आदेश द्यावे

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मनुवादी संभाजी भिडेलाअटक करण्याचे आदेश द्यावे

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मनुवादी संभाजी भिडेलाअटक करण्याचे आदेश द्यावे


अन्यथा बहुजन जनता दलाचा राज्यस्तरीय आंदोलनाचा इशारा. पंडितभाऊ दाभाडे

पुणे दि. मुंबई साम चित्रवाणी टीव्हीच्या महिला पत्रकार रूपाली बडवे यांनी कपाळावर टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देणाऱ्या मनुवादी संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारांचा खाजगी पणाच्या अधिकारांचे उल्लंघन होईल असे वर्तन करीत विनयभंग केला आहे मनुवादी संभाजी भिडे विरुद्ध आयपीएस कलम ५०९ नुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अन्यथा बहुजन जनता दल राज्यस्तरीय मनुवादी संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन करणार असा इशारा बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिला आहे.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेल्या मनुवादी संभाजी भिडे यांनी आपल्या मनुवादी प्रवृत्तीच्या विधानाने मुंबई साम टीव्हीच्या महिला पत्रकार रूपाली बडवे यांच्या खाजगी पणाच्या विरुद्ध टिपणी केली आहे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार कपाळावर टिकली लाव असा उर्मटपणा करीत काल मंत्रालयाच्या सार्वजनिक ठिकाणी राजे रोज पणे विनयभंग केला आहे एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याचा हेतूने तिच्याकडे पाहणे बोलणे शब्द उच्चारणे किंवा कृती करणे एखादी वस्तू बोटाने दाखवणे ती पाहण्यासाठी तिचे लक्ष वेधून घेणे किंवा तिच्या खाजगी पणाचे उल्लंघन होईल असे वर्तन करणे या गुन्ह्यासाठी एक वर्ष सजा किंवा दंड आहे दोन्ही अशा शिक्षा तरतूदही आहे असे हि बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी म्हटले आहे.
लोकशाहीत प्रत्येकाला आपलं स्वेच्छेने राहण्याचा आणि जगण्याचा अधिकार व हक्क दिले आहे मनुवादी संभाजी भिडे मात्र महिलांच्या ह्या अधिकाराला मान्य करीत नाही आणि जुमानत सुद्धा नाही महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ अंतर्गत कलम १०(१)ए एफ व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्वीकारणे आणि त्या बाबींची सह अधिकाराने दखल घेतली पाहिजे महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही या कारणास्तत्व तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला म्हणून मनुवादी संभाजी भिडे ला नोटीस पाठवली आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने भिडे यांना नोटीस पाठवल्याच्या या निर्णयाचे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी स्वागत केले आहे.
कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकारांशी बोलण्यास नकार देण्यामागील भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३ कलम १२(२) व १२(३) नुसार दिला नाही तर नकार तात्काळ गुन्हा नोंद करून अटक करावी अशी अशी तरतूद आहे. मनवादी संभाजी भिडे केवळ प्रतिक्रिया देण्यास नकार दिला नाही तर नकार देताना उद्धट व अरेरावी पणे टिपणी केली व एका पत्रकार महिलेचा विनयभंग केला आहे विनयभंग प्रकरण आरोपींना खुलासा मागणीचा कुठलाही पद्धतीने तरतूद नाही त्यामुळे खुलासे मागवून कागदोपत्री कारवाई करण्यापेक्षा थेट पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंद करून तात्काळ मनवादी संभाजी भिडे ला अटक करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने अपेक्षित होते मनुवादी संभाजी भिडे च्या विधानाचा बहुजन जनता दल जाहीर निषेध करीत असून पोलिसांनी मनुवादी संभाजी भिडे ला अटक करावी जर का मनुवादी संभाजी भिडे ला अटक करण्यास विलंब लागल्यास बहुजन जनता दल राज्यस्तरीय आंदोलन करणार या आंदोलन दरम्यान राज्याची सुव्यवस्था बिघडली किंवा ढासळली तर या सर्व गोष्टीला राज्य शासन आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिला आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *