सांगली जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना कवलापूर विमानतळ येथील जागेवर घरकुले बांधून मिळण्याबाबत व बांधकाम कामगारांचे सर्व थकीत अर्ज त्वरित मंजूर करण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांधकाम कामगारांचे जोरदार आंदोलन

सांगली जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना कवलापूर विमानतळ येथील जागेवर घरकुले बांधून मिळण्याबाबत व बांधकाम कामगारांचे सर्व थकीत अर्ज त्वरित मंजूर करण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांधकाम कामगारांचे जोरदार आंदोलन



सांगली जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना कवलापूर विमानतळ येथील जागेवर घरकुले बांधून मिळण्याबाबत व बांधकाम कामगारांचे सर्व थकीत अर्ज त्वरित मंजूर करण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांधकाम कामगारांचे जोरदार आंदोलन
शिष्टमंडळाच्या वतीने सांगलीचे जिल्हाधिकारी श्री राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये कॉमेडी शंकर पुजारी यांनी खालील मुद्दे मांडले
1 ऑगस्ट 2022 रोजी आणि सात सप्टेंबर 2022 रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चानी जाऊन सांगली जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना घरकुले मिळावीत असे निवेदन दिलेले होते. हे निवेदन कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांनाही दिल्यानंतर त्यांनी जिल्हा पातळीवरील शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन असे घोषित केले की, सांगली जिल्ह्यातील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांच्या साठी घरकुल योजना राबविण्यात येईल.
त्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये शासकीय मालकीच्या ज्या जमीनी असतील त्याबद्दलची माहिती एका महिन्यात त्यांनी गोळा करावी असे आदेश पालकमंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले होते. त्यानुसार त्यांनी माहिती गोळा केलेली आहे.
त्याचबरोबर आज कवलापूर विमानतळाची जी जागाआहे त्या ठिकाणी नोंदीत 77 हजार बांधकाम कामगारांच्या साठी ग्रह प्रकल्प राबविण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले की हा धोरणात्मक निर्णयाचा प्रश्न आहे त्यामुळे गांभीर्याने महाराष्ट्र शासनाकडे त्या मागणीबाबत कळविण्यात येईल.
सध्या सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करून लाभ मिळावे त्यासाठी एकूण एक लाख 4 हजार 547 इतके अर्ज मंडळाकडे पोहोचले आहेत. त्यापैकी 90252 अर्ज प्रक्रियेमध्ये आहेत. 77884 अर्ज बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत मंजूर केले आहेत आहेत. स्पष्टीकरणासाठी 11401 इतके अर्ज आहेत पेंडिंग अर्ज एकूण 14 हजार 295 इतकी आहेत. त्यापैकी 967 अर्ज नाम मंजूर झालेले आहेत. ही सर्व आकडेवारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मुंबई कार्यालया मधून कॉ शंकर पुजारी यांनी ता.10/10/2022 रोजी घेतलेली आहे. या आकड्यावरून हे स्पष्ट होते की सांगली जिल्ह्यामध्ये 14295 अर्ज गेल्या अनेक महिन्यापासून पेंडिंग आहेत. याबाबत डॉक्टर राजा दयानिधी यांनी आश्वासन दिले की तातडीने त्यांनी साहेब कामगार आयुक्त श्री अनिल गुरव यांना फोन करून सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत कार्यवाही करावी असे आदेश दिले.
दुसरा बाजूला अडीच महिन्यापूर्वी कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांनी जाहीर केलेले होते की दोन महिन्यात सर्व पेंडिंग अर्ज निकाली निघतील परंतु प्रत्यक्षात मात्र अडीच महिने झाल्यानंतरही सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 14 हजार 295 इतके अर्ज पेंडिंग असून 14 हजार 295 इतके नोंदीत कामगार या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मिळणाऱ्या सर्व लाभापासून वंचित आहेत.
मागील आघाडीच्या सरकारच्या वेळेस पालकमंत्री श्री जयंत पाटील व कामगार मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी बागवान व मुलांनी या महिलेना त्यांच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पतीचे निधन झाले म्हणून दोन दोन लाखाचे डिजिटल चेक दिले. पण प्रत्यक्षात एक वर्ष होऊन गेले तरी या दोन महिलांना त्यांच्या पतीच्या अंत्यविधीची दहा हजार रुपये रक्कम सुद्धा अद्याप मिळालेली नाही. शिष्टमंडळामध्ये यास्विन मुजावर या विधवा महिलेचा समावेश होता. त्यांनी अर्ज करून एक वर्ष झाले तरी त्यांना कसलीही नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही.अशा अनेक शेकडो महाराष्ट्रामध्ये महिला आहेत की ज्यांच्या पतीचे निधन झालेले आहे परंतु या मंडळाकडून काहीही लाभ मिळालेला नाही. प्रत्यक्षात सध्या या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 14 हजार कोटी रुपये कामगारांच्या कल्याणासाठी जमलेले आहेत. परंतु त्या रकमेवरील व्याजाइतकी रक्कम सुद्धा दरवर्षी बांधकाम कामगारांच्या वर खर्च केली जात नाही. प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठीच जमा केलेल्या उपकाराच्या रकमेचा काहीही लाभ कामगारांना दिला जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या मध्ये या सरकार बद्दल असंतोष वाढत चाललेला आहे.
मागील दोन वर्षांमध्ये सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 300 पेक्षा जास्त कामगारांनी घरकुल मिळण्यासाठी दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत सांगली सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडेअर्ज केलेले आहेत परंतु सांगली जिल्ह्यातील एकाही कामगारास ही रक्कम मिळालेली नसून त्यांचे सर्व अर्ज मागील दोन वर्षापासून पेंडिंग आहेत.
सांगली जिल्ह्यातील ज्या नोंदीत बांधकाम कामगारांना स्वतःचे घर नाही किंवा घरासाठी जागा नाही त्यांना घरासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने अनेक जीआर काढलेले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणूनच निदान नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या घरकुल बांधण्यासाठी तरी शासकीय जमीन ताबडतोब उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.
तसेच कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सर्व जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना शासकीय जमीन देण्याबाबत अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे.. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास नाइलाजस्तव सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना तीव्र आंदोलन करावे लागेल. असे आंदोलनकर्त्यासमोर चर्चा झाल्यानंतर बोलताना कॉमेडी शंकर पुजारी यांनी सांगितले.
या आंदोलनामध्ये श्री अमोल माने, विशाल बडवे, संतोष बेलदार, रोहिणी कांबळे, विजय पाटील, प्रभाकर जाधव ,यास्मिन मुजावर, अर्चना बेळंके, ईश्वरी कोष्टी, दत्ता लोहार, सलीम इनामदार व बाबासाहेब पकाजादे इत्यादींनी महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *