विषाचे फुत्कार काढणार जंत

विषाचे फुत्कार काढणार जंत

विषाचे फुत्कार काढणार जंत

✍🏿 नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

‘सैदामीनी आधी कुंकू लाव’ हे वाक्य एका मराठी चित्रपटात ऐकले होते. पण हा डायलॉग जेव्हा संस्कृतीच्या नावाने आभाळ हेपलणारे मनोहर पंत कुलकर्णी आपल्या सडक्या तोंडातून जेव्हा बाहेर काढतात तेव्हा त्यातून मनुच्या विचारांची घाण येते. कारण या ब्राम्हण समाजातील पलावळींनी महीला आणि मुलींना अनेक बंधनात जखडून ठेवले होते. पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुच्या त्या विषमतावादी स्मृतीला काडी लावून समस्त महीला व भारतीयांना या जोखडातून मुक्त केले. त्यामुळे आमच्या महीला मुली खुप शिकल्या तर काही शिकून हुकल्या देखिल. शिकलेल्या पैकी काही मुली जेव्हा या व्यवस्थेला प्रश्न विचारून सळो की पळो करून सोडतात तेव्हा त्यांना संस्कृतीच्या नावाखाली दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण भारतीय राज्यघटनेने दिलेल्या हक्क आणि अधिकारामुळे जेव्हा त्या ब्राह्मणवादी बांडगुळांच्या तोंडावर फायतानाचे फटके देऊ लागतात तेव्हा खुप जबरदस्त वाटत. कारण मनुने त्यांचे हात बांधले होते.
सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन ज्यांनी स्वराज्य स्थापन केले त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मनोहर कुलकर्णी हा मनुवादी किडा रात्रंदिवस जातीय द्वेष पसरविण्याचे काम करतो. त्याला सांगावं वाटतं की, ‘शिव’ हे नाव वापरून महाराष्ट्रात दंगलसदृश वातावरण निर्माण करण्यापेक्षा दंगलीचे जनक भटमान्य टिळकाच्या नावाने ‘टिळक’ प्रतिष्ठान स्थापन करायला काय अडचण आहे ? ‘शिव’ हे नाव लोकांना एकत्रिततेच्या सुत्रात गुंफण्यासाठी वापरण्याचे प्रतीक आहे, त्यामुळे टिकळ ? प्रतिष्ठाणच्या मनोहर पंताचा मणका बघून दणका द्यायची वेळ आहे. कारण मानवी विष्ठेतील हा मनुवादी किडा काल पण वळवळताना दिसला.
मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्या भेटीनंतर मंत्रालयातून बाहेर पडत असताना एका महिला पत्रकारांशी संवाद साधताना तोंडातून विषाचे फुत्कार सोडताना म्हणाले की, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे, अन् आमची भारतमाता विधवा नाही. तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो, असा पत्रकाराला सल्ला दिला. (लोकमत ०३ नोव्हें २२) ‘भारत’ हा पुरुषवाचक शब्द असताना मनोहर कुलकर्णी ‘भारत माता, भारत माता’ अशी का म्हणून बोंब मारत असतील ? भारत जर माता असेल तर पिता कोण आहे ? महीला पत्रकाराने विचालेल्या प्रश्नांना घाबरणारा हा मनुवादी किडा लोकांना सल्ले देण्यापेक्षा स्वतः रामदासाप्रमाणे अंगात साडी चोळी घालत डोक्याला मळवट घालून का फिरत नाही ? त्यामुळे ह्या शेणकुडातील शेंगदाण्याला सांगावं वाटतं की, आमच्या महीलांनी काय परिधान करावे आणि डोक्याला काय लावावं हे आपल्या घरातील बायका पैश्यापायी विकणा-या ब्राम्हणांकडून शिकायची गरज नाही. आमच्या बहुजन समाजातील महीलांनी ह्या भटा ब्राह्मणांच ऐकू नये. कारण ‘ब्राम्हण तोंडावर मिश्या असलेल्या बायका आहेत’ असं १९५० च्या ब्राम्हण परिषदेतील ठरावाला विरोध करताना एका ब्राम्हण महीलेनेच म्हटले आहे. विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘आईचा गळा कुर्हाडीने तोडणा-या आवलादी भारताला म्हणतात माता
माता म्हणंत म्हणतच हे ब्राम्हण
मातेचा काढतील काटा !’
‘पुरूषार्थ दाडी-मिशीवर नसतो
तर तो कर्तबगारीत असतो
मग हे मनोहर मिशा का पाळतात
त्या तर झुरळालाही असतात’
हे विद्रोही कवी विश्वंभर वराट यांचे शब्द मनोहर कुलकर्णीसाठी शंभर टक्के लागू पडतात. कारण दिंडीत तलवारी घेऊन शिरण्याची भाषा करणा-या मनोहर कुलकर्णी याला शस्त्र पेलेल का ? कारण शुरा साजती हाथियारे गांड्या हसतील पोरे असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. त्यामुळे तर डाॅ. बालाजी जाधव यांनी ब्राम्हणांना थेट इशारा देण्यासाठी ‘ब्राम्हणांनो शस्त्र हाती घ्या’ हे पुस्तक लिहून ब्राम्हणांचा नपुंसकपणा अधोरेखित केला आहे. पण आमचा समाजही थोडासा अकलेने कमी आहे असं म्हटलं तरी चालेल कारण यांना बहुजन चळवळीतील पुस्तकांचे वाचण करण्यापेक्षा रामायण महाभारतात हनमान चालिसा अशा अनेक ब्राम्हणी ग्रंथांना थुका लावून बोटे चाटायची सवय लागली आहे. पण त्यांनी कधी तरी ब्राम्हण ब्राम्हणवादी आणि त्यांचे विनाशकारी विचार समजून घ्यावेत कारण ते येणा-या आपल्या पिढीचा नाश करणारे आहेत. ‘टिळक ?’ प्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी यांनी महिला पत्रकाराला बोलण्यास नकार दिला. त्यावर पत्रकार रूपाली बडवे ने प्रतिक्रिया देताना म्हटले की, टिकली लावणे किंवा न लावणे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणत्याही महिलेसोबत हा प्रकार घडणं अत्यंत निंदनीय असून मी या घटनेचा निषेध करते. माझ्या सारख्या इतर क्षेत्रांतील महिलांसोबत सुद्धा हा प्रकार घडत असेल. अशा सर्वच महिलांनी एकत्र येवून समजासमोर निर्भिडपणे बोलणं महत्वाचं आहे. (मटा. ०३ नोव्हें. २२)
तुकोबा पेक्षा मनु श्रेष्ठ म्हणणारा हाच तो टिळकटवेल्या मळकटलेल्या विचारांचा मनोहर कुलकर्णी आहे. याच्या वक्तव्याचा केवळ बामसेफ, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या संघटनांसह मोजक्या वारक-यांनी विरोध केला होता. मग प्रश्न पडतो की, नामदेव व तुकोबांचे नाव घेऊन कंबरा बांधून काल्पनिक कथा लोकांना सांगून संघाच्या विचारांची पेरणी करणारे तथाकथित हभप कोणाच्या कंबरेला मिठ्या मारून बसले होते ? परस्त्री रुक्माई समान मानणारे तुकाराम महाराज होते. तर मग त्यांचे नाव घेऊन तुंबडी भरणारे हभप महीलांचा अवमान करणा-या मनोहर कुलकर्णीचा निषेध करताना का दिसत नाहीत. त्यामुळे बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, तुम्ही जे गावागावात कंबराला पांढरे पटृटे असलेले लोक पैसे देऊन आणतात ते अप्रत्यक्षपणे मनोहर कुलकर्णी जो काम करतो तेच करतात, मग आपण यांच्यावर विनाकारण पैसा का उधळावा ? याचा विचार करा. कारण ह्यांच्या डोक्यातील विचार हे रेशिमबागेतील जंतूंची घातलेले आहेत. त्यामुळेच ते तुकोबांचा व महीलांचा अवमान होत असतानाही षंढ आणि थंड बसतात. म्हणून तर सिमा पाटील लिहतात,
भिड्यासारखे वेडे फिरती चहुकडे
गिरवत फिरतात अज्ञानाचे धडे
अक्कल यांची धावे नेहमीच घोड्यांच्याही पुढे
हिंदुत्वाचे उचलावे म्हणे स्त्रीयांनीच विडे
मानवता वादाला यांच्या लागतात किडे
स्मशानात निम्याहुन अधिक गेली यांची लाकडे
बोलायचं बंद कधी होतील मनोहर पंत भिडे ?
मनोहर कुलकर्णीच्या वक्तव्याच समर्थन करणारा व्यक्ती हा त्याच विचारधारेचा अथवा असाच असतो असं म्हटलं तरी चालेल. म्हणून शरद पोंक्षे म्हणतो की, ‘एका चर्चच्या बाहेर लावलेला फलक. यात स्त्रियांनी काय कपडे घालावे याच्या सूचना आहेत. इथे स्लिवलेस, शॉर्ट्स, क्रॉप टॉप किंवा मिनी घालून गेल्यास पाद्री कपडे बदलून या मगच सोडेन असे सांगतात’. त्यांनी पुढे म्हटलंय, ‘पाद्रींचे आडनाव भिडे/कुलकर्णी नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही. (०५ नोव्हें २२) बहुजन समाजातील महीलांनी कस रहावं हे पोंक्षे कडून शिकावे लागेल का ? समलैंगिक खेळाचे प्रयोग करणारे नथुराम व विनायक यांच्या नपुंसकी मानसिकतेत घडलेले पोंक्षे स्वत:ला काय लय मोठे तत्त्ववेत्ते समजतात का ? पोंक्षेनी महीलांना सल्ले देण्यापेक्षा खुशाल आपला पृष्ठभाग कोणाकडून तरी माजवून व वाजवून घेत मनोहर कुलकर्णी यांनाही ह्या खेळाचे सारस्थ करू द्यावं त्यांच्याशी आमचा कवडीमात्र संबंध नाही.’ म्हणून तर कुलकर्णीच्या वक्तव्याचा निषेध होतोय आणि समाजातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची दखल थेट राज्य महिला आयोगाने घेत ‘टिकली लावली नाही तर प्रतिक्रिया देणार नाही’ या भुमिकेसंदर्भात स्पष्टीकरण भिडे यांनी तात्काळ द्यावं अशी नोटीसच पाठवली आहे. (लोकसत्ता ०२ नोव्हें. २२) म्हणून तर सिमा बोके म्हणतात की, ‘म्हतारपणामुळे डोक्यात पडलेत किडे, देशाचे नाव रोशन करणा-या सुनिता विल्यम्स, कल्पना चावला गंध पावडर घेऊन गेल्या होत्या का अंतराळात ?’ तसेच चित्रा वाबळे म्हणतात की, ‘टिकली हा त्याचा प्रश्नच नव्हता मुळात, एक महिला प्रश्न विचारते यामुळे पोटसुळ उठले आणि ओल्या दुष्काळात शेतकरी सडतोय ते लक्ष हटविणे हा उद्देश होता त्या निच मन्याचा…..!’
प्रश्न विचारला की, अनेकांची बोलती बंद होते त्यात ‘मन्या तो किस पेड की पत्ती हैं!’ म्हणून संतोष डोंगरे म्हणतात की,
‘तीची टिकली हा प्रश्न नव्हता, ती त्याला प्रश्न विचारण्या इतपत शिकली हा जळफळाट होता.’ त्यामुळे बहुजन समाजातील महीलांना सांगावं वाटतं की, मनोहर कुलकर्णी सारखा एखादा किडा परत जर का असं वळवळला तर त्याला जागीच सुतासारख सरळ करण्याची धमक निर्माण करा. कारण तुम्ही त्यांचं जोपर्यंत ऐकून घेणार आहात तोपर्यंत हे किडे आपल्याला ढसत राहणार आहेत. या किड्यांसाठी संतोष अहेर लिहतात की, ‘कट्टर हिंदुत्ववाद्यांनी पंधरवड्यात, महीनाअखेर साडी, टीकली, जोडवे, बांगड्या घालून आपले हिंदूंत्व सिध्द करून दाखवावे.’ म्हणून तर महीलांनो आॅल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार म्हणतात की, ‘किड्यांच थोबाड का फोडलं नाही ? त्या महीला पत्रकाराने एक थोबाडीत दिली असती तर ‘मी मनुची गुलाम नाही’ हा संदेश गेला असता… पुन्हा महीलांना गुलाम करण्याची हिंमत कुणाची झाली नसती ! मनुस्मृती कायदा मानणा-या नालायकावर, टिकली लाव तरच बोलतो म्हणणा-या मानसिक रोग्यांवर… आजच्या संविधानाच्या कायद्यांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून हिसका दाखवला पाहीजे !.’ म्हणून विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘ज्याच्या डोक्यात वळवळतात
मनुवादी नरककीडे
त्या वृत्तीचेच दुसरे नाव
केवळ मनोहर भिडे .’

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *