इचलकरंजी :-
येथील दि सोशल को ऑप क्रेडिट सोसायटीच्या रिक्त झालेल्या संचालकपदी हामिद इलाही बारगीर (सर्वसाधारण गट), महमंदगौस मखतूम मुजावर (सर्वसाधारण गट), सौ. मुमताज आप्पालाल मुजावर (महिला राखीव)आणि रसूल मेहबूब गवंडी (अनुसूचित जाती जमाती) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सोसायटीच्या संचालक मंडळाची सन २०२१-२६ या कालाधीची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. तथापी १३ पैकी ६ संचालकांनी राजीनामे दिले होते. ६ फेब्रुवारी २०२४ च्या मिटींगमध्ये चार संचालकांचे राजीनामे मंजूर करणेत आले तर उर्वरीत २ संचालकांचे राजीनामे नामंजूर करणेत आले. याबाबत उपनिबंधकसाो सहकारी संस्था हातकणंगले यांचे कार्यालयात रिक्त जागा भरणेबाबत मागणी करणेत आली होती. यास अनुसरुन उपनिबंधकसो यांच्या आदेशान्वये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. शिंदे यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. रिक्त पदासाठी चारच अर्ज आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध झाली.
नूतन संचालक हामिद बारगीर, महमंदगौस मुजावर, सौ. मुमताज मुजावर आणि रसूल गवंडी यांचा बिनविरोध निवडिनंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्री शिंदे यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
यावेळी संस्थेचे आधारस्तंभ राजभाई बारगीर, लेखापरिक्षक अमिन ढालाईत, संस्थेचे चेअरमन मुबारक खलीफा, व्हाईस चेअरमन उमरफारुख लाटकर, संचालक दस्तगीर पठाण, रियाज मोमीन, अतिकुर्रहमान समडोळे, संतोष कांबळे, गौस जमादार, सौ. यास्मिन मुल्ला तसेच संस्थेचे हितचितंक जमीर मुल्ला, शकील मोमीन, जमीर मुजावर, रफिक बारगीर, फारुख शेख, शब्बीर मोमीन व समीर मुजावर उपस्थित होते.