कोष्टी कला महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ
इचलकरंजी –
देवांग समाज आणि हटकर कोष्टी सेवाभावी ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित कोष्टी कला महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला. देवांग समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांचे हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
समाजातील उदयोन्मुख कलाकारांच्या अंगभूत कलागुणांना स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, त्यांना आपली कला सर्वांसमोर सादर करता यावी या उद्दात हेतुने आयोजित महोत्सवाचे प्रमुख आकर्षण १० फुटी समाजाच्या देवीच्या मुखवट्याचे पूजन करून दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या महोत्सवात महाराष्ट्रातून जवळजवळ १०० कलाकारांची नोंद झाली असून एकूण ३५० कलाकृती पाहण्यास उपलब्ध आहेत.
येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे हा महोत्सव चार दिवस चालणार आहे.
शिल्पकलेतील उत्कृष्ठ कलाकृती तसेच ललित कला महाविद्यालय यांच्या विद्यार्थ्यांचाही कलाकृती तसेच इंम्प्रेशन फोटोग्राफी क्लब यांची मनमोहक अनेक विषयांची फोटोग्राफी पाहण्यास उपलब्ध आहे. महोत्सवात कॅम्लीन कंपनीचा स्टॉलही उपलब्ध आहे. तसेच चित्रकार श्रीरंग मोरे, सचिन जोशी, मनोज सुतार, विनायक चिखलगे, ओमकार कुंभार या कलाकारांची प्रात्यक्षिके होणार आहेत.
याप्रसंगी राजेंद्र सांगले, रमेश कबाडे, मधुकर वरूटे, गजानन होगाडे, महेशराव सातपुते, दत्तात्रय ढगे, विजयराव मुसळे, प्रशांत सपाटे, व्ही. आर. कुलकर्णी, हटकर कोष्टी सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल सरबी, कोष्टी कला महोत्सवाचे प्रमुख अध्यक्ष हेमंत कबाडे आदी उपस्थित होते. १९ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुले राहणार आहे. महोत्सव यशस्वीतेसाठी निखिल करोशी, संजय आगलावे तसेच ट्रस्टचे पदाधिकारी अशोक वरूटे, प्रमोद वरूटे, लक्ष्मीकांत नखाते, राजेश उरणे, अविनाश महाजन, गजानन उंदुरे, संजय बिद्रे, राजेंद्र बिद्रे, सौ. सुलभा कबाडे, सौ. विद्या वरूटे, कु. सेजल कांबळे, अमृता फाटक व ललित कलाचे प्राचार्य व्ही. आर. कुलकर्णी परिश्रम घेत आहेत. आभारप्रदर्शन पुष्कर उत्तूरे यांनी मानले.
Posted inकोल्हापूर
कोष्टी कला महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ
