प्रबोधिनीत शहीद पानसरे यांना अभिवादन

प्रबोधिनीत शहीद पानसरे यांना अभिवादन

प्रबोधिनीत शहीद पानसरे यांना अभिवादन

इचलकरंजी ता.२० समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य शहीद कॉ. गोविंद पानसरे यांच्या नवव्या स्मृतिदिनी समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शहीद कॉ.गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला समाजवादी प्रबोधिनीच्या सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले,शहीद पानसरे यांनी शेतकरी ,कष्टकरी, व्यवस्थित भरडलेल्या वर्गाला न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. प्रबोधकांचे प्रबोधक असलेले पानसरे यांचे जीवन संघर्षरत होते. विकृत विचारधारेच्या भ्याड हल्लेखोरानी त्यांना शरीराने संपवले असले तरी त्यांचे विचार नष्ट होणार नाहीत.कारण त्यांची नाळ सर्वसामान्य माणसांशी आहे. शहीद कॉ. पानसरे यांच्या विचारावर वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
यावेळी सौदामिनी कुलकर्णी, अन्वर पटेल, पांडूरंग पिसे , अप्पासो कालेकर, हर्षल अगसर, शिवाजी कदम,नंदा हालभावी,अश्विनी कोळी आदी उपस्थीत होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *