एक लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त :
आंतरराज्य सराईत दोन चोरट्यांना अटक
कोल्हापूर – आंतरराज्य सराईत दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून ३२ ग्रॅम सोने व इतर साहीत्य असा एकुण १,६०,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने (वय. ३२, रा. घर नं. ६१०, बिल्डींग नं. ५, चाफेकर चौक, वेताळनगर, चिंचवड, पुणे) व धनंजय हरिश काळे (वय. १९, रा. काटे चाळ, गणपती मंदीरा शेजारी, कासारवाडी, पुणे) अशी संशयित आरोपींची नावे असून कोल्हापूरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे.
याबाबत एल.सी.बी. कडून मिळालेली माहिती अशी की, रेकॉर्डवरील गुन्हेगार चंद्रकांत माने व धनंजय काळे यांनी प्रियदर्शनी कॉलनी, जयसिगंपूर भागात घरफोडी केली असुन ते दोघेजण आज मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी पुणे- कोल्हापूर रोडवरील, किणी, ता. हातकणगंले गावचे हद्दीतील माऊली पान शॉप जवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने किणी गावच्या हद्दीतील माऊली पान शॉप येथे सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व टायटन कंपनीचे एक घड्याळ असा एकुण एक लाख साठ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपी चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने याच्यावर महाराष्ट्र व कनार्टक राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकुण २० घरफोडीचे गुन्हे, तसेच धनंजय हरिश काळे याच्या विरोधात एकुण ३ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार राजीव शिंदे, महेश खोत, संजय कुंभार, प्रशांत कांबळे, सतिश जंगम, विजय इंगळे, सुशिल पाटील, राजेंद्र वरंडेकर, कृष्णात पिंगळे, अमित मर्दाने व सायबर पोलीस ठाणेकडील सचिन बेंडखळे यांनी केली.