
कोल्हापूर : परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . शाहू स्मारक येथे कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता व ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते छत्रपती शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शाहूंच्या नगरीत काम करण्याची संधी मिळाल्या मुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो असे उद्गार जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी आपल्या भाषणात सांगितले.

छत्रपती शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून समतेची शिकवण दिली त्यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतील असे मनोगत ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले.
यावेळी बी न्यूज चे कार्यकारी संपादक ताज मुल्लानी यांनी छत्रपती शाहू राजेंचे कार्य येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील असे आपल्या प्रास्ताविकांत सांगितले.

याप्रसंगी राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्काराने डॉ राजेंद्रसिंग वालिया, जेष्ट पत्रकार उमेश जामसंडेकर ( विरार ) , डॉ अमरकुमार तायडे ( मुंबई ) , सौ शोभा पाणदारे ( शिरढोण ) भुषण धामणे ( पालघर ), हिंदरत्न डॉ दिपक लोंढे (मिरज ) सचिन मुळे (बुलढाणा ), डॉ आशाताई काकडे (पुणे ) सय्यद वाजीद सय्यद लुकमान बुलढाणा ) पत्रकार संभाजी कांबळे (राधानगरी ) दिलावर शेख आय्युब ( बुलढाणा ) सन्मानीत करण्यात आले .

तसेच पेठवडगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता भाग्येश पवार, नेत्रचिकित्सा अधिकारी चंद्रशेखर चांदोरकर, मानसी दिगंबर कुलकर्णी, मेडिकल कॉलेजच्या एच ओ डी डॉ. अनिता परितेकर, वडणगेच्या माजी उपसरपंच सौ. स्वाती नाईक, सामाजिक कार्यकर्ते जीवन कांबळे, निवृत्त ए.एस.आय. तात्यासाहेब कांबळे, चैत्र पालवी चे कवी, लेखक मोहन कांबळे, मंगल कांबळे, आरोग्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी नामदेव मोरे, सागर कांबळे , प्रा. आंनद भोजने, शिवशाहीर दिलीप सावंत, धनुर्विद्या राष्ट्रीय खेळाडू डॉ. प्राजक्ता सूर्यवंशी यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

यावेळी परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मीचे संस्थापक प्रमुख अध्यक्ष संतोष आठवले, शेतमुजरांचे नेते सुरेश सासने, मच्छिंद्र रुईकर , संजय कांबळे, नितेश कुमार दीक्षांत आदी उपस्थित होते.