निवारा महिला क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटी पतसंस्था उद्घाटन समारंभ सांगली भावे नाट्य मंदिर मध्ये शनिवारी संपन्न.

सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उद्घाटन समारंभ सुरू करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील असंघटित उद्योगात काम करणाऱ्या महिला उदाहरणार्थ बांधकाम कामगार महिला, आशा, गटप्रवर्तक महिला, शेतमजूर महिला, बेघर महिला व असंघटित उद्योगातील महिला यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी व बचतीची सवय लावण्यासाठी ही पतसंस्था स्थापन करण्यात आलेली आहे. असे या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष स्वयंसेवी संस्थांच्या नेत्या मीना शे शेषू यांनी सांगितले.

पतसंस्था उद्घाटन समारंभामध्ये पतसंस्थेस शुभेच्छा देत असताना ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते डॉक्टर शरद भुथाडिया यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यात असंघटित उद्योगातील कामगारांच्यामध्ये काम करीत असलेले कॉ शंकर पुजारी व सुमन पुजारी यांना आम्ही मागील 40 वर्षापासून ओळखतआहोत.त्यांनी सातत्याने असंघटित उद्योगातील कामगारांना व महिलांना धीर देत असतानाच त्यांच्यामध्ये किमान सांस्कृतिक जाणिवा रुजवण्यासाठी काही कार्यक्रम घेतलेले आहेत उदाहरणार्थ प्रत्यय नाट्यसंस्थेचे अनेक नाट्यप्रयोग त्यांनी केल्या अनेक वर्षापासून करणे सुरू ठेवलेल आहे. अशा महत्त्वपूर्ण संघटनेस आणि महिलांना केंद्रित करून होत असलेल्या महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यास त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यानंतर ज्येष्ठ संपादक श्री वसंत भोसले यांनी सांगितले की देशातील आणि महाराष्ट्रातील सध्या सहकार चळवळ अनेक अडचणी मधून संकटांमधून जात आहे अशा वेळेस सुद्धा खऱ्याखुऱ्या अर्थाने कष्टकरी कामगारांच्या मध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्थांची उणीव आजही आहे त्यामुळे असंघटित उद्योगातील विशेषता स्त्रियांच्यासाठी पतसंस्था चालवणे हे एक मोठे आव्हान आहे परंतु हे आव्हान सांगली जिल्ह्यातील या बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया, अशा, गटप्रवर्तक, शेतमजूर महिला मिळून यशस्वी होतील .आणि ही संस्था चांगल्या प्रकारे त्याचा विस्तार होईल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जयसिंगपूर येथील पतसंस्थेच्या मॅनेजर श्रुती जोशी यांनी सांगितले की महिलांच्यासाठी पतसंस्था चालवणे हे सध्या अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांनी ही पतसंस्था सुरू करून एका चांगल्या कार्यास सुरुवात केलेली आहे त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करू असे त्यांनी सांगितले.
या उद्घाटन समारंभामध्ये प्राध्यापिका नंदा पाटील यांनी महिलांच्या या नोंदणीकृत पतसंस्थेच्या चेअरमन प्रा.शरयू विशाल बडवे यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
डॉक्टर दिपाली श्रावस्ती, सुमन पुजारी कॉ शंकर पुजारी, सदाशिव मगदूम व व विशाल बडवे इत्यादींची भाषणे झालीइत्यादींची भाषणे झाली.
मार्क्स इन सोहो या नाटकाचा प्रयोग उद्घाटन समारंभ संपल्यानंतर लगेच घेण्यात आला.
यामध्ये वृद्ध कार्ल मार्क्स ची भूमिका व नाटकाचे दिग्दर्शन डॉक्टर शरद भुताडिया यांनी केलेल असून तरुण कार्ल मार्क्सची भूमिका प्रा.आदित्य खेबुडकर यांनी केले . मार्क्सच्या पत्नीची भूमिका रसीया खेबूडकर यांनी केलेली आहे. तसेच या नाटकाचे मूळ अमेरिकन लेखक हॉवर्ड झिन हे असून त्याचे भाषांतर साहिल कल्लोळी यांनी केलेली आहे. या महत्त्वपूर्ण प्रायोगिक नाटकास प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.